प्रा. प्रदिप नंदनवार यांना पीएचडी पदवी प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत कार्यरत असलेले अधिव्याख्याता प्रा. प्रदिप मधुकर नंदनवार यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी रसायनशास्त्रातील पीएचडी पदवी प्रदान केली आहे.
त्यांचा संशोधनाचा विषय “एंजिनियरिंग पोरस ऑर्गनिक पॉलिमर्स फॉर कार्बन डायऑक्साईड अँड ऑर्गनिक पोलूटंटस कॅप्चर” हा होता. त्यांना प्रा. डॉ. रवीन जुगादे, प्राध्यापक, अॅनालिटिकल केमिस्ट्री विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या यशासाठी संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. राजन वानखडे, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र राचलवार, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. आशीष बहेंडवार यांच्यासह विभागप्रमुख प्रा. जयंत बोरकर, प्रा. माधुरी नागदेवे, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. मीनाक्षी मानलवार, प्रा. नितीन डोरलिकर, प्रा. हस्तीमल कुमावत अधिव्याख्याता प्रा. डॉ. नितीन पोटे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. प्रा. डॉ. प्रदिप नंदनवार यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील श्री. मधुकरजी नंदनवार, आई सौ. शिलिकांता नंदनवार, पत्नी सौ. हिना नंदनवार आणि भाऊ यांना दिले.



