राजा शिवछत्रपती विचारमंचाच्या वतीने सि.राजा जाणाऱ्या जिजाऊ भक्तांसाठी करण्यात आली अल्पोपहाराची व्यवस्था..!
मागील ११ वर्षा पासून अखंडित सेवा करत राजा शिवछत्रपती विचारमंचाची या वर्षी ही प्रथा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव मही येथे छत्रपती शिवरायांच्या धोरणारवर चालणारे ।। राजा शिवछत्रपती विचारमंच यांच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित महिलाच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तसेच राजा शिवछत्रपती विचारमंचा चे सर्व विश्वस्थ यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
सामाजिक सलोखा जोपासत समतावादी बहुजन विचारांचा वारसा जपत कार्य करणारे राजा शिवछत्रपती विचारमंच हे मागील 11 वर्षा पासून सदर पोहे चहा वाटपाचा कार्यक्रम सातत्य ठेवत यशस्वी रित्या पार पाडत आहे.परिसरात एकमेव असणारा हा कार्यक्रम असून सि. राजा येथे जानाऱ्या जिजाऊ भक्तांसाठी पोहे, व चहा वाटपाचा कार्यक्रम या वर्षी ही ठेवण्यात आला होता.
या अल्पोपहाराचा मोठ्या संख्येने जिजाऊ भक्तांनी आस्वाद घेतला.यावेळी विविध शहरातील, ग्रामीण भागातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी राजा शिवछत्रपती विचारमंच च्या सर्व टीम चे कौतुक केले,आणि हे कार्य कायम करत रहावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विचारमंच अध्यक्ष राम वसंतराव शिंगणे,उपाध्यक्ष रंगा शिंगणे,संभाजी राजे शिंगणे,ऍड आदिल एच पठाण,बळीराम शिंगणे, सचिव रवी मुळे, दीपक शिंगणे, प्रवक्ते गजू शिंगणे, संजय आंधळे,समाधान पवार,सचिन नागरे,सचिन शिंगणे,किशोर शिंगणे,ज्ञानेश्वर शिंगणे , शे. रईस, रघु शिंगणे,देवा पाटील शिंगणे,नाना हिवाळे,अभि शिंगणे,संदीप नागरे,गौरव सोनसळे,संतोष वाघ,नितेश पालवे,शिवा इंगळे, पुरुषोत्तम शिंगणे, बालाजी गावंडे,सचिन पाटील दहातोंडे, गणेश आंधळे,मंगेश भुतेकर,ज्ञानू शिंगणे,अमोल शिंदे,गणेश शिंगणे,राम जिजोते,यश,ओम यांच्या सह समस्थ राजा शिवछत्रपती विचारमंच च्या सर्व विश्वस्थ मंडळींनी परिश्रम घेतले.



