25 जानेवारी रोजी जायंटस सहेली ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरात दिनांक 4 जानेवारी रोजी जायंटस सहेली ग्रुप ची स्थापना झाल्यानंतर या ग्रुपच्या सदस्यांनी तात्काळ समाजपयोगी कामाला सुरुवात केली आहे दिनांक 11 जानेवारी रोजी श्री संतोषी माता मंदिर मध्ये या सहेली गृप ची मीटिंग संपन्न झाली या मीटिंगमध्ये शहरातील सर्व शाळातील वर्ग पाच ते सात व आठ ते दहा या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले या चित्रकला स्पर्धेचे *विषय पर्यावरण सुरक्षा* व *वन्यजीव चित्रकला* *वाईल्ड लाईफ पेंटिंग* यावर या दोन्ही गटातील शालेय विद्यार्थी यांनी चित्र काढायचे असल्याची माहिती या ग्रुपच्या सचिव लता हरकुट यांनी दिली. तसेच या चित्रकला स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीसे जाहीर करण्यात आलेली आहे. ही चित्रकला स्पर्धा जायंटस वेलफेअर फाऊंडेशन द्वारा संचलित जायंटस गृप ऑफ देऊळगाव राजा व जायंटस सहेली गृप च्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. सदर चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक 25 जानेवारी रोजी करण्यात आलेले आहे यावेळी ग्रुप च्या अध्यक्षा किरण अंबुसकर, अनुराधा सराफ, मालती कायंदे, लता हरकुट,कल्याणी कायस्थ , ज्योती आगेवाल, शशी भाला, शकुन गुप्ता, प्रभा काबरा,नीलम गुप्ता, राधिका व्यास, मनीषा व्यास, सविता पाटील, निर्मला सराफ उपस्थित होत्या.



