ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोपीय कार्यक्रम आसन बुद्रुक, गट ग्रामपंचायत बिबी या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम उपस्थित होते तसेच विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजने चे जिल्हा समन्वयक भालचंद्र लोडे तसेच प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राचार्य शरद जोगी, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक विजय डाहुले, उपसरपंच आशिष देरकर गट ग्रामपंचायत बिबी, पोलीस पाटील प्रवीण आडे, सोमेश्वर आडे माजी सैनिक, सुनिता नैताम गटप्रवर्तक , मीनाताई पंधरे अंगणवाडी सेविका, शामसुंदर चिकराम, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रदिप परसुटकर, प्रा. सुधीर थिपे, प्रा. चेतना येरणे , विनोद भोगेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे विशेष अतिथी भालचंद्र लोडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास होते त्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले तर विशेष अतिथी सेवानिवृत्त प्राचार्य शरद जोगी यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रदिप परसुटकर यांनी केले तर संचालन नरेंद्र हेपट व आभार संगीता पुरी यांनी केले याप्रसंगी आसन बु. या गावातील प्रमुख मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे स्वयंसेवक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये