पोहरागड येथे ज्ञानप्रकाश लोकसंस्थेच्या कार्याचा गौरव
संस्थाध्यक्ष श्रीपत राठोड यांना मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
धर्मगुरू तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशनच्या वतीने ज्ञानप्रकाश लोकसंस्थेचा समाजासाठी केलेल्या सेवाभावी कार्याचा एका जाहीर कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
ज्ञानप्रकाश लोकसंस्थेला सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय विकास प्रक्रियेला चालना देणाऱ्या अनेकविध उपक्रमाच्या माध्यमातून योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.पोहरागड येथे आयोजित कार्यक्रमात बंजारा समाजाचे अनेक मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थेचे भारतातील विविध राज्यातील प्रतिनिधीचा प्रामुख्याने सहभाग सहभाग होता.उपेक्षित,वंचित दुर्लक्षित,गोरगरीबांच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेली ज्ञानप्रकाश लोकसंस्था
शिक्षण,महिला सक्षमीकरण, युवकांसाठी कौशल्य विकास,आदिवासी लोकांसाठी कल्याणकारी उपक्रम,शेतकऱ्यांसाठी शाश्वतशेती,जैविक शेती,सिंचन प्रकल्प निर्मिती,कुपोषण इ.महत्वपूर्ण समस्यांवर तळागाळातील लोकांसोबत लोकांसाठी काम करत आहे.ज्ञानप्रकाश लोकसंस्थेद्वारा केलेल्या सामाजिक कामाचा विचार करून धर्मगुरू तपस्वी संत डॉ.रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशनने ज्ञानप्रकाश लोकसंस्थेचे अध्यक्ष श्रीपतभाऊ राठोड यांना संस्थात्मक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
श्रीपतभाऊ राठोड यांच्या सामाजिक कार्याबद्दल यापूर्वीही अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.ज्ञानप्रकाश लोकसंस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि कवी,लेखक श्रीपतभाऊ राठोड यांनी अनेक दशकांपासून समाजासाठी केलेल्या त्यांच्या लोकसहभागातून लोकविकास या कार्यपद्धतीद्वारे सामाजिक कार्यातून आपली एक वेगळी प्रेरणादायी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या कार्यातून, विचारातून समाजाला निश्चितपणे नवी दिशा मिळते.त्यांच्या सन्माबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.



