स्पर्धेच्या युगानुसार अपडेट होणं महत्त्वाचं _ मुकुंद दुबे
राजुरा येथे फार्मसी मॅनेजमेंट कोर्स

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सध्याच्या अत्यंत स्पर्धात्मक औषध व्यवसायात केमिस्ट्स ना सक्षम, अद्ययावत व व्यावसायिक दृष्ट्या मजबूत करणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन चे उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी राजुरा येथील श्री शिवाजी सायन्स कॉलेज येथे आयोजित
फार्मसी मॅनेजमेंट कोर्स प्रसंगी रविवार, दि. ११ जानेवारी ला व्यक्त केले.
हा उपक्रम केमिस्ट हृदयसम्राट .जगन्नाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल अंतर्गत ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या आयोजनात व चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ,राजुरा, कोरपना, जीवती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
व्यवसायिक आव्हानांवर प्रभावी मार्गदर्शन
सध्याच्या बाजारपेठेतील वाढती स्पर्धा, ई-फार्मसीचा प्रभाव, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि डिजिटलायझेशन यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केमिस्ट्सनी कोणती धोरणे स्वीकारावीत, याबाबत या कोर्समध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
औषध वितरण व्यवस्थापन, स्टॉक मॅनेजमेंट, ग्राहक सेवा, विश्वासार्हता आणि व्यवसाय वृद्धी यावर विशेष भर देण्यात आला.
प्रसिद्ध तज्ज्ञ किशोरीताई भोयर फार्मसी कॉलेजचे प्रा. दिनेश बियाणी यांनी फार्मसी व्यवसायातील बदलते नियम, औषध विक्रीतील कायदेशीर बाबी तसेच प्रभावी व्यवस्थापन कौशल्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
त्यांनी औषध विक्रीतील नवी धोरणे व कायदे, ई-फार्मसी व ऑनलाइन स्पर्धेला सामोरे जाण्याच्या उपाययोजना, ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे तंत्र
औषध साठा व वितरण व्यवस्थापन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर उपस्थित केमिस्ट्सना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन चे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल उपाध्यक्ष धनंजय जोशी, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सचिव अविनाश जाधव उपस्थित होते.
तसेच नागपूर झोन महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर समन्वयक हृषीकेश गोखरे, चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन माजी अध्यक्ष गोपाल एकरे, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन संघटन सचिव मिलिंदभाऊ गंपावार, चंद्रपूर जिल्हा केमिस्टं अँड ड्रगिष्ट असोसिएशन उपाध्यक्ष प्रशांत जाजू, कोषाध्यक्ष अनुप वेगीनवार, जिल्हा संघटन सचिव प्रशांत गोठी, जिल्हा सहसचिव जयंत दांडेकर, पी आर ओ अनिलभाऊ काळे ,
राजुरा तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष कैलाश रेगुंडवार,सचिव अँड. राकेश अल्लूरवार, कोरपना तालुका संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देवतले , सचिव विनोद चटप, जीवती तालुका संघटनेचे अध्यक्ष मुजाहिद देशमुख व सचिव देविदास खंदारे बल्लारपूर तालुका अध्यक्ष निशिकांत खैरे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी राजुरा व्यापारी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप जैन व ॲड . राकेश अल्लूरवार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सचिन पिंपळकर यांनी केले.
केमिस्ट्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राजुरा, कोरपना व जीवती तालुक्यातील मोठ्या संख्येने केमिस्ट बंधू-भगिनींनी या कोर्समध्ये सहभाग घेतला. या प्रशिक्षणामुळे व्यवसायासाठी नवा दृष्टिकोन मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, व्यवस्थापन कौशल्ये व ग्राहक सेवा सुधारण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत सहभागी केमिस्ट्सनी व्यक्त केले.



