ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे ,एमसीवीसी विभाग प्रमुख प्राध्यापिका आरजु आगलावे , समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा.नितीन वाढई यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा बाळू उमरे यांनी केले ,या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



