ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत भगवान बाबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

परमपूज्य सद्गुरु वैकुंठवासी ह भ प श्री संत भगवान बाबा (भगवानगडकर) यांच्या 61 व्या पुण्यतिथी निमित्ताने गेल्या 19 वर्षापासून कोणताही खंड न पडता विसाव्या वर्षी सुद्धा संत भगवान बाबा प्रतिष्ठान तथा सर्व समित्यांचे प्रमुख सदस्य व गावकरी मंडळी देऊळगाव राजा यांचे वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक 4 जानेवारी ते 11 जानेवारी 26 या कालावधीत करण्यात आले . अखंड हरिनाम सप्ताह ती सांगता दिनांक 11 जानेवारी रोजी परमपूज्य गुरुवर्य हभप श्री डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसादाने करण्यात आली.

 भगवान बाबा नगर येथील श्री संत भगवान बाबा यांच्या मंदिरात गेल्या 19 वर्षापासून कोणताही खंड न पडता विसाव्या वर्षी सुद्धा प.पू.सद्गुरु वै. हभप श्री संत भगवान बाबा (भगवानगडकर) यांच्या 61 व्या पुण्य तिथी निमीत्ताने

मोठ्या प्रमाणात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक 4 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत भावीक भक्तासाठी कीर्तनकार कडून प्रबोधनात्मक जनजागृती करण्यात आली, तर भागवताचार्य परमपूज्य गुरुवर्य श्री ह भ प वेदांत केसरी डॉक्टर अनिरुद्ध महाराज क्षिरसागर माळ सावरगाव यांनी श्रीमद् भागवत कथेचे आपल्या मुखातून वाचन केले.

पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी व शेकडे भाविक भक्तांनी या सप्ताहात धार्मिक बाबीचा व सांगता समारोप प्रसंगी हभप डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला सर्व समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले. सप्ताहाचे सांगता समारोप प्रसंगी या विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी उपस्थीत राहून काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला .

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये