वरोरा-भद्रावती तालुका ऊस लागवड शेतकरी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकरी उत्पादक कंपनी तथा मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बेला,युनिट-१ यांच्या संयुक्त विदमानाने नंदोरी गट, वरोरा – भद्रावती तालुका ऊस लागवड शेतकरी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दि.१९ सप्टेंबरला सायं ५ वाजता मोठ्या थाटात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मानस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सारंग नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मानस इंडस्ट्रीज बेलाचे उपाध्यक्ष जयकुमार शर्मा, प्रबंध संचालक समय बनसोड,प्रबंधक जयंत ढगे, कृषी विभाग प्रमुख किशोर हुलके,मानस इंडस्ट्रीज संचालक नरेंद्र जीवतोडे, मानस इंडस्ट्रीज तथा अध्यक्ष शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपूर जिल्हा तसेच नंदोरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक मंडळ कपिल रांगणकर, संदीप झाडे, प्रकाश निब्रड, संदीप एकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपर्कप्रमुख प्रकाश वांढरे,कृषी सहाय्यक संजय नारळे, नरेश गेडेकर, मनोज येनुरकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पर पडला . या सोहळ्याला ऊस लागवड शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.