विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
निळकंठराव शिंदे महाविद्यालयाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथे आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय बी एस सी गणित सेमिस्टर तीन व चार साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
सदर कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके तर प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक डॉ एल एच खालसा, चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज इन मॅथेमॅटिक्स गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली उपस्थित होते तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ पी एच मुंजनकर सदस्य बीओएस मॅथेमॅटिक्स गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व डॉ चेतना एम भोंगळे,सदस्य बीओएस मॅथेमॅटिक्स गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली उपस्थित होते
सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सावित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून झाली
या कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका प्रा प्रतीक नन्नवरे स्पष्ट केली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ एल एच खालसा यांनी बी.एस.सी सेमिस्टर तीन व चारच्या सिल्याबस मध्ये झालेले बदल त्याचबरोबर विएससी आणि स्किल यामध्ये अंतर्भूत केलेले थेरी तसेच सॉफ्टवेअर आधारित प्रॅक्टिकल जसे सेज सॉफ्टवेअर याविषयी सविस्तर अशी माहिती दिली
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये अर्पित खरवडे यांनी सेज सॉफ्टवेअर संदर्भात इन्स्टॉलेशन तसेच त्याचा वापर करून कॅल्क्युलस, जॉमेट्री, इंटिग्रेशन, अशा विविध गणितीय समीकरणाला सोडवण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करावा याविषयी माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ एल एस लडके यांनी त्यांनी नवीन एन ई पी अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल त्याबरोबरच मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये नव्याने अंतर्भूत केलेले विएससी चे प्रॅक्टिकल त्याबरोबरच फिल्ड प्रोजेक्ट हे विद्यार्थ्यांना कसे समजून सांगावे याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस आकांक्षा आवारी तर आभार प्रदर्शन श्री प्रतीक नन्नावरे यांनी केले
या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातून शिक्षकवृंद उपस्थित होते
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता डॉ अपर्णा धोटे,डॉ एम एन खादरी,डॉ किरण जुमडे,प्रा संदीप प्रधान,प्रा कुलदीप भोंगळे,प्रा सचिन श्रीरामे,श्री प्रमोद तेलंग,श्री शरद भावरकर, यांनी अथक परिश्रम घेतले