ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिखली बु आदर्श शाळेचे राजकुमार मुन विषय शिक्षक (प्रभारी मु. अ.) जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  जिल्हा परिषद चंद्रपूर (शिक्षण विभाग) यांचे वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात १२ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे  पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी ऑनलाइन पद्धतीने केले.

     गडचांदूर पाटण मार्गे डोंगर चढल्यावर पहिलच गाव चिखली बु संपूर्ण आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम असलेल्या जेमतेम ४०० ते ५०० लोक वस्तीचं गाव शिक्षणाचा गंध फार कमी, अत्यंत गरीब हलकीचे जीवन जगणारे आदिवासी बांधव! अशा ही परिस्थितीत मुलांनी शिकावं हा आशावाद श्री राजकुमार नारायण मुन या शिक्षकांनी घेऊन ज्ञानाचा प्रकाश दाखवला. प्रथम  आदिवासी थिप्पा या गावापासून १९९२ पासून शिक्षक सेवेला सुरुवात करून जामनि, बैलमपूर, बीबी या गावात सेवा देत २०१७ ला विषय शिक्षक म्हणून  चिखली शाळेत रुजू झाले.शाळेत वर्ग-१ते ८ असून पाच गावचे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने १०६ वरून १३३ वर शाळेचा पट वाढवला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने पाठ्य घटकावर व्हिडिओ बनवणे, शैक्षणिक साहित्य तयार करणे, विद्यार्थ्याचे व्हिडिओ बनवून विनोबा ॲप वर टाकने, दीक्षा ॲपवरील व्हिडिओ डाऊनलोड करून अध्यापन कार्य करणे ज्ञान रचनावाद, विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न सदर शिक्षकांनी केला, शिष्यवृत्तीचे सराव वर्ग घेऊन दरवर्षी शिष्यवृत्ती विद्यार्थी पात्र ठरवले, निपुण अभियानांतर्गत मागे असलेल्या विद्यार्थ्यांचे सराव वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना वाचन लेखन व संख्याज्ञान निपुण करण्यात आले. सदर शिक्षक एवढ्यावरच थांबले नाही तर क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम नवरत्न, विज्ञान प्रदर्शन इन्स्पायर अवॉर्ड यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना तालुका,जिल्हा ,राज्य स्तरावर पोहोचवण्याचे काम केले. विशेष म्हणजे शाळेतील दोन विद्यार्थी इस्रो व हैद्राबाद येथे अभ्यास दौऱ्यावर गेले होते. सदर शिक्षकांनी  सन २०२४-२५ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यातून शाळेला द्वितीय क्रमांक मिळवला

     राज्य शासनाने २००-२१ मध्ये मॉडेल स्कूल घोषित केल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने, ग्रामपंचायत, महाराष्ट्र वितरण कंपनी सीआरएस फंडातून शाळेच्या ९० टक्के भौतिक सुविधा पूर्ण केल्या. त्यामध्ये अँड्रॉइड टीव्ही व्हिडिओ कॉन्फरन्स,टीव्ही, प्रिंटर,खुर्च्या,टेबल, आलमारी, वॉटर फिल्टर  इत्यादी उपलब्ध केल्या.

शाळा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा म्हणून बाला पेंटिंग, फुलबाग,फळबाग वृक्ष लावणे व संवर्धन करणे. उत्कृष्ट अशा परस बागेमुळे सन २०२१-२२ मध्ये द्वितीय क्रमांकाचे तीन हजार रुपये व सन २०२४-२५ मध्ये प्रोत्साहन पर दोन हजार रुपये चे बक्षीस मिळाले, सामाजिक क्षेत्रामध्ये गरीब, हुशार  होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली व आर्थिक व पुस्तकाच्या स्वरूपात मदत करून त्यांचे शिक्षण पूर्ण  केले,बुक,पेन, स्कूल बॅग चे वाटप केले. पतसंस्था चंद्रपूरचे पाच वर्ष उपाध्यक्ष म्हणून सेवा केली.

राष्ट्रीय कार्यामध्ये रक्तदान जनगणना राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्य तसेच कोविड काळात कार्य केले. या त्यांच्या शैक्षणिक सामाजिक राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर(शिक्षण विभाग) यांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने माननीय आमदार सुधाकरजी अडबाले यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोगरेवार, आमदार सुधाकर अडबाले, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पुलकित सिंग साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारीअधिकारी मा. गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीना साळुंखे व नूतन सावंत  शिक्षणाधिकारी (प्राथ.)मा. अश्विनी केळकर शिक्षणाधिकारी (माध्य.)मा. राजेश पातळे  सर्व तालुक्याचे मा. गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. दोडके साहेब गटविकास अधिकारी पं. स. जीवती मा. अमर साठे साहेब गटशिक्षण अधिकारी, मा. देवानंद रामगीरकर शिक्षण विस्तार अधिकारी बिट पाटण, मा. चौधरीसाहेब शिक्षण विस्तार अधिकारी, मा. श्रीमती साधना धांडे मॅडम केंद्रप्रमुख केंद्र पाटण व केंद्रातील सर्व शिक्षक बांधव तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंजूषा करपाते, कसानदास चव्हाण उपाध्यक्ष, व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच गेडाम ताई, उपसरपंच सत्तू करपते, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले आहे. तसेच प्रस्ताव तयार करण्यासाठी बोबडे मॅडम, भजने मॅडम, पवार सर, चव्हाण सर, वाकुडकर सर यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये