ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरात सोमवारपासून ‘भाऊचा दांडिया’ची धूम

खा. धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत अकरा दिवस विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शहराच्या सांस्कृतिक जीवनात उत्साहाची नवी लहर आणण्यासाठी चंद्रपूरमध्ये सोमवार, २२ सप्टेंबरपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘भाऊचा दांडिया’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम चांदा क्लब मैदानावर होणार आहे.

दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेतून या दांडियाची सुरुवात झाली होती, आणि ती परंपरा आजही अखंड सुरू आहे. या महोत्सवात गरबा-दांडियाचा मनमुराद आनंद लुटण्यासोबतच स्पर्धकांना दोन दुचाकी आणि रोख बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा महोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन नसून, तो समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याचा एक मंच आहे. विशेषतः तरुणाईचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी पहिल्यांदाच लाइव्ह संगीतावर दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण, क्रीडा, कला आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.

हा महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. ‘भाऊचा दांडिया’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, ज्यात दोन विजेत्यांना दुचाकी आणि इतर रोख बक्षिसे दिली जातील. चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये