ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जे.बी.नगर गल्लीत साचते पाणी

कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

येथील जगन्नाथ बाबा नगर लाॅकडाऊन ग्राऊंडच्या दुस-या गल्लीत सकाळच्या वेळेत नळ आल्यानंतर श्रीवास्तवच्या घरासमोरील रोज सीमेंट रोडवर सतत पाणी साचून राहत असल्यामुळे येणा-या जाणा-यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.या सीमेंट रोडवर जागोजागी खड्डे पडलेले असून घरातील पाणी खड्डयांमध्ये सतत साचून राहत असल्यामुळे मच्छरांचा हैदासही वाढल्याचे चित्र आहे.
या वार्डात काम करणा-या कंत्राटदाराच्या लक्षात ही बाब आणूनही त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. वार्डात अनेक सीमेंट रोडचे टच अपचे काम कंत्राटदाराने केले.प्रत्यक्ष एकदा येऊन ही परिस्थिती बघितली परंतु ते काम त्यांनी केले नाही.हा दुजाभाव का?असा या गल्लीतील नागरिकांना प्रश्न पडलेला आहे.काहींनी महानगर पालिकेत जाऊन तक्रार नोंदविण्यासाठी पाऊल उचल्याचे बोलले जाते.
संबंधितांनी या सीमेंट रोडचे टच अप करुन नागरिकांचा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा व पाणी साचून राहणार नाही,अशी सोय करावी ही मागणी जोर धरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये