अनधिकृत असलेले फवारणीचे औषध विक्री करणारे बाहेर राज्यातील आरोपीतांवर कारवाई करुन 11 लाख 95 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 12/09/2025 रोजी माहिती मिळाली की बाहेर राज्यातील दोन इसम अनधिकृत असलेले फवारणीचे औषध विकी करीता त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्विप्ट डिझायर कार क्रमांक टी.एस. 08 एच.डी.4499 गाडीने हिंगणघाट परिसरात फिरत आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व कृषी विभागाचे भरारी पथक, वर्धा तसेच कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगणघाट यांनी संयुक्त कारवाई करून अनधिकृत असलेले फवारणीचे औषध विकी करणाऱ्या इसमांचा शोध घेत असता सदरचे दोन्ही इसम हे हिंगणघाट ते सातेफळ रोडवर मिळून आल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) शंकर उशन्ना पालथ, वय 50 वर्ष, रा. गुडा, ता. जैनात, जिल्हा अदिलाबाद ( तेलंगणा) 2) गिरीश लक्ष्मारेड्डी येल्टीवार, वय 46 वर्ष, रा. वार्ड 36 शांतीनगर आदिलाबाद, ता. जिल्हा अदिलाबाद (तेलंगणा) असे सांगितले वरून त्यांच्या ताब्यातील मारुती कंपनीची पांढऱ्या रंगाची स्विप्ट डिझायर कार क्रमांक टी.एस. 08 एच.डी.4499 गाडीची पाहणी केली असता गाडीचे डिक्की मध्ये अनधिकृत असलेले फवारणीचे औषधाचे 09 खर्डाचे खोक्यात बायो जेनेटीक प्रा.लि. हैद्राबाद राज्य तेलगंणा कंपणीच्या Acto, Jumper, Three – D, Genflower, Humic Z, N Flower, Plantek च्या सिलबंद बाॅटल मिळून आल्याने दोन्ही आरोपीतांच्या ताब्यातून 1) 09 खर्डाचे खोक्यात बायो जेनेटीक प्रा.लि. हैद्राबाद राज्य तेलगंणा कंपणीच्या Acto, Jumper, Three – D, Genflower, Humic Z, N Flower, Plantek च्या सिलबंद बाॅटल कि. 2,45,603/- रु.
2) एक मारुती कंपनीची पांढऱ्या रंगाची स्विप्ट डिझायर कार क्रमांक टी.एस. 08 एच.डी.4499 ची कि. 9,00,000/- रु.
3) एक विवो कंपणीचा मरहुम रंगाचा अँड्रॉइड मोबाईल कि. 25,000/- रु.
4) एक सॅमसंग कंपणीचा निळ्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल कि. 25,000/- रु.
5) एक निळ्या रंगाची व्यवहार नमुद असलेली डायरी, कि. 00.00/- रु. असा एकुण जु.कि. 11,95,603/- रु. चा माल पंचा समक्ष जप्ती पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीतां विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 1315/2025 कलम 318 (4), 3 (5) भारतीय न्याय संहीता 2023, सहकलम 2, 5, 7, 8, 11, 20(ब) रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 सहकलम 3, 7 अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल व आरोपीतांना पो.स्टे. हिंगणघाट यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, अनुप कावळे, पो.अ. विनोद कापसे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व जिल्हा भरारी पथकाचे श्री शिवा जाधव, कृषी विकास अधिकारी वर्धा, श्री प्रमोद पेटकर, जिल्हा नियंत्रण निरीक्षक वर्धा, श्री शुभ्र कांत भगत कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) हिंगणघाट यांनी केली.