राष्ट्रीय महामार्ग ३५३ बि रस्ते अपूर्ण? टोल वसुली सुरु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगाना महाराष्ट्र राज्यशी जोड़नारा बामणी राजुरा कोरपना गोविन्दपुर राष्ट्रीय महामार्ग ३५३ब 2022 पासून कामाला शुरुआत झाली या रास्ते वरील अनेक ठिकांचे कामेअपूर्ण असून वर्धा नदीवरील पुलाचे व गडचांदूर उड्डान पुल काम सुरुचझाले नाहीं बामनवाडा राजुरा बामणी हा मार्ग अपूर्ण असताना तसेच रस्त्याचे बाजुच्या सिमेवर सरक्षंण क्राकीट वाल अनेक ठिकाणीअपूर्ण आहे.
असे असतानाराजमार्ग प्राधिकरणाने टोल वसुलीची बडगा दि १३ सप्टेंबर पासून सुरु केल्याने नागरीका मध्ये असंतोष उफाळला आहे आहे आवश्यक सोयी सुविधा दिलेल्या नाही कुसळ लोणी फाटा इंजापुर फाटा वडगाव लालगुडा हनुमान जवळ रूपापेठ कोठोडा गोविन्दपुर या बस धाब्यावर प्रवासी सुविधा देण्यात आलेले नाही तसेच जि आर आय एल इन्फ्रा या कंपनीने कोरपना राजुरा तालुक्यात नाले व तलाव उत्खनन करूण सार्वजनिक रस्त्याचे तिन तेरा केल्याने वाहतुकीसाठी माथा फाटा कुसळ धानोली खडकी रुपापेठ जेवरा चनई हातलोणीया रस्त्याची वाट लावल्याने ठीक ठिकाणी खड्डे पड़ले आहे.
या भागातील संपूर्णनाले पोखरून मान्यतेपेक्षा अधिक रेती दगड मुरूम उपसा झाल्याने नाल्या काठावरील गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याची ओरडआहे पैनगंगा नदी तुन पर्यावरण नियमाचा सर्रास उल्लंघन करूण वाळु उपसा झाला अनेक तक्रारी असताना वाळुचेपाप पुराच्या पाण्यात गंगेत वाहून गेल्याने शासनाच्या महसुल व अतिरिक्त उत्खननावर पड़दा पडल्याने खनिकर्म विभाग व इन्फा कंत्ररटदार सुखाची झोप घेत असेल तरी जनतेच्या भावना व शासनाच्या नियम धोरण वेशीलाटांगीत बांधकाम पुर्ण झाले नसताना काल पासून टोल वसुलीचा सपाटा सुरु केला आहे.
वास्तविक कोरपना परिसरात सर्वाधिक शेतकरी वर्ग आहे कोरपना वरुण चन्द्रपुर व्हाया नांरडा भोयगाव कमी अतंर असत्याने वनसडी वरूण थेट चन्द्रपूर मार्ग असत्याने राष्ट्रीय महामार्ग ७ ते ८ कि मी वापर होत असताना चारचाकी खाजगी वाहन एकल १०० रू तथा वापसी सह १४० रु हे परवडणार नाही तसेच प्रवासी वाहतुक साठी अधिक कर आकारले आहे स्थानिक व २० कि मी परीसरातील वाहन धारकाना न्यायलयाच्या निर्देशा प्रमाणे सुट सवलत मासीक पास सुविधा उपलब्ध करूण द्यावी व प्राधिकरणाचे ३५३बि महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण होत पर्यंत टोल वसुली स्थगित करावी.
अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आबिद अली यांनी केन्द्रीय रस्ते विकास मंत्री राज्याचे बांधकाम विकास मंत्रीं जिल्हाधिकारी आमदार प्रकल्प प्रमुख . राजमार्ग प्राधिकरण यांना पाठविलेल्या निवेदना तुन केली आहे