महात्मा गांधी विद्यालय येथे हिंदी दिवस साजरा
नृत्य स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे हिंदी दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यासाठी समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उप मुख्याध्यापक विजय डाहुले, पर्यवेक्षिका माधुरी मस्की, सेवानिवृत्त हिंदी शिक्षक मनोहर बुऱ्हाण, होते.
प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक वर्ग 5 ब, द्वितीय 7 अ, तृतीय क्रमांक 6 क, यांनी पटकाविला
तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक 8 ब , द्वितीय क्रमांक 10 ब , तृतीय क्रमांक 10 ड ने पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण गायत्री पिंपळकर व वैशाली हेपट यांनी केले. प्रास्तविक भारती घोंगे यांनी केले. संचालन जिया पठाण, श्रुती राम, अरायना महाडोळे यांनी केले, कार्यक्रमाच्या सफलतीसाठी टिपले मॅडम, केळकर मॅडम, इखारे मॅडम, कोयचाडे सर, येलादी यांनी परिश्रम घेतले.