लोक अदालतमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या 2945 केसेस निर्गती तर 18 लाख 78 हजारावर शासकीय दंड वसूल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 13/09/25 रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन हें मा न्यायालयात करण्यात आलेले होते त्यामध्ये ज्या वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले होते त्यांच्या शासकीय दंडाच्या केसेस तडजोडी करीता आज लोक अदालत मद्ये ठेवन्यात आलेल्या होत्या त्यातील चालक यांना ही लोक अदालत चे समन्स बजावणी ही वाहतूक शाखे कडून करण्यात आलेली होती.
त्यास वाहन चालकांनी चांगला प्रतिसाद दिला व एकूण 2945 चलन केसेस या निर्गती निघून 18,78,750 रुपयांचl शासकीय दंड हा आज लोक अदालत मध्ये व वाहतूक शाखे मध्ये चालकांनी भरणा करून आपल्यावाहना वरील मोटार वाहन कायद्याच्या केसेस या निर्गती केल्यात तरी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले शिस्त पाळली तर त्यांना चलन केसेस होणार नाही आर्थिक दंड आकारला जाणार नाही याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांनी केलेले आहें,
पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतूक शाखा वर्धा