ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा मुक्तीसंंग्राम दिनानिमित्त राजुरा भूषण सन्मानाची घोषणा

चांदा ब्लास्ट

        दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीने राजुरा शहरातील विविध संघटनांच्या सहकार्याने दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी राजुरा मुक्तीदिन सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात यावर्षी राजुरा क्षेत्रातील मुळ असलेल्या आणि उल्लेखनीय कार्य करणा-या सात नागरिकांना राजुरा भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

            यावर्षी राजुरा भूषण सन्मानाचे राजुरा क्षेत्रातील पहिले सर्जन डाॅ.रूपेश सोनडवले, एओन बंगलूरचे संशोधन व एशिया पॅसिफिक प्रमुख डाॅ.विशाल बोनगिरवार, ब्रिटीश सरकारची शेवेनिंग शिष्यवृत्ती प्राप्त करणारा देशातील सर्वात तरूण वकील ॲड.दिपक चटप, आदिवासी समाजातील पहिली उच्च विद्याविभूषित डाॅक्टर वर्षा कुळमेथे – पंधरे, क्षेत्रातील नाभिक समाजातील पहिले डाॅक्टर संकेत शेंडे, सिंधी समाजातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट रोशन हावडा, क्विकलिफ आंतरराष्ट्रीय ॲम्बुलन्स कंपनीचे संस्थापक शोएब शेख हे विविध क्षेत्रातील सात मान्यवर यावर्षी

मानकरी ठरले आहेत, अशी माहिती मुक्तीदिन उत्सव समितीचे प्राचार्य दौलत भोंगळे, संयोजक अनिल बाळसराफ, सहसंयोजक मिलींद गड्डमवार, कार्यक्रम प्रमुख दिलीप सदावर्ते, समन्वयक प्रा.डाॅ.हेमचंद दुधगवळी, सहसमन्वयक मिलींद गड्डमवार, कैलास उराडे, प्रा.विजय आकनुरवार, गणेश बेले, अल्का सदावर्ते यांनी दिली.

       राजुरा हे क्षेत्र मुक्तीसंग्राम लढ्यानंतर हैद्राबाद स्टेट सह स्वतंत्र होऊन भारत देशात विलीन झाले. या ऐतिहासिक लढ्याचे औचित्य साधून गेल्या १७ वर्षापासून राजुरा येथे राजुरा मुक्तीदिन उत्सव समिती मुक्तीसंग्राम सोहळ्याचे आयोजन करीत आहे. याप्रसंगी राजुरा क्षेत्रातील मुळ रहिवाशी असलेल्या मान्यवरांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येतो.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये