चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करा
अन्यथा टोल बंद आंदोलन : सुयोग भोयर यांची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर- नागपूर महामार्गवर पावसामुळे झालेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची शृंखला वाढली असून तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशा आशयाचा मागणीचे निवेदन शिवसेना (उ.बा.ठा.)चे जिल्हा प्रमुख कामगार सेना (वरोरा-भद्रावती) सुयोग भोयर यांनी जिल्हाधिकारी यांना व स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग येथील अभियंत्यांना दिले असून येत्या सात दिवसात खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आठव्या दिवसापासून टोल वसुली बंद करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदन सोपवितांना कामगार सेना जिल्हाप्रमुख सुयोग भोयर,माजी नगरसेवक निलेश पाटील, अशोक निगम, सांगत सिंह,विक्की कामतवार,जावेद जाबिर् शेख,सम मानकर,शंकर भैय्या आदी उपस्थित होते.या मागणीचे निवेदन खा,प्रतिभा धानोरकर,आ.करण,देवतळे,तहसीदार भद्रावती,मुख्य अभियंता, शासकीय बांधकाम विभाग, चंद्रपूर यांना पाठविण्यात आले आहे.