महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयच्या वतीने ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर, जिल्हा, चंद्रपूर आणि Excellence Global Skills Training & Development Organization यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या वेळेत “Career Guidance through Financial Literacy – Educational & Motivational” या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
या वेबिनारमध्ये रिसोर्स पर्सन कु. रुचिता वेदांत चांडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आर्थिक व्यवस्थापनाचे उद्दिष्टे ठरविण्याचे तंत्र, जबाबदाऱ्या संपत्तीत रूपांतरित करण्याचे मार्ग, सायबर क्राईमपासून बचावाची माहिती तसेच आर्थिक व्यवस्थापनातील कमतरतेमुळे नोकरी बदलण्याच्या समस्या आणि त्यावर उपाय यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय यशस्वी करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण टिप्सही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेन्द्र देव होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वेबिनारचे आयोजन करण्यात आले. तर समन्वयक म्हणून श्री. चेतन वैद्य यांनी कार्यभार सांभाळला.
या वेबिनारसाठी १०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग नोंदविला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना करिअर नियोजनासोबतच आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित झाले.