धानोली येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम करा
विजय रणदिवे माजी सरपंच यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील धानोली ते धानोली गुडा जोडणारा नाल्यावरील पूल पुर्न धोकादायक झाला आहे. आजच्या घडीला केव्हाही पुलावर जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी माजी सरपंच विजय रणदिवे व ग्रामस्थानी केली आहे.
धानोली ते गुडा नाल्यावरील पुलाचे निर्मिती पंधरा वर्षा झाली या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,मशानभूमी,तसेच कारगाव जोडरस्ता, आदिवासी तीस कुटुंबे वास्तव्याला असून जवळपास पन्नास शेतकऱ्याची शेती याच भागात आहे. त्यामुळे नाल्यावरील पूल हे याभागातील जनतेला येजा करण्यासाठी महत्ववाचे आहे .गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गासाठी या नाल्याचा मुरूम उपयोगात आणून जी आर कंपनीने मोठया प्रमाणात नाला खोलीकरण केले.
या आधी पुराच्या पाण्याचा प्रवाह पसरत जात असल्याने पुलाला धोका होत नव्हता मात्र दोन वर्षा पासून नाला खोलीकरणाने प्रवाह अरुंद झाल्याने पुलाच्या दोन्ही पुलात भरण भरलेले वाहून केले असून पूल आतून पोकळ झाले आहे दोन्ही बाजूचे गडर वाहून गेले आहे त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. पावासाळ्यात पुलावरून मोठया प्रमाणात पुराचे पाणी आल्याने मार्ग बंद होता त्यामुळे गुडयावरील लोकांना ,शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी , तसेंच मशान भूमीत अंत्यविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पूल दोन्ही बाजूनी पोकळ झाल्याने जीवित हानी होण्याची घटना नाकारता येत नाही तरी सदर पुलाचे नवीन बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभाग चंद्रपूर याच्या कडे माजी सरपंच विजय रणदिवे यांच्यसह ज्योतीराम मंगाम,दशरत नैताम,दिलीप मडावी, भीमराव आत्राम,कवडू मडावी,हर्षल किन्नके,प्रफुल मडावी,फकरू आत्राम ग्रामस्थानी मागणी केली आहे.