घुग्घुस येथील मुस्लिम बांधवांनी दाखवली मानवतेची ओळख
पंजाब पूरग्रस्तांना २.२० लाखांची मदत ; पंजाब पूरग्रस्तांसाठी जमा ₹२,२०,७८६ निधी.

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : धार्मिक सौहार्द आणि बंधुत्वाचे अद्वितीय उदाहरण घालून देत घुग्घुस येथील मुस्लिम बांधवांनी पंजाबच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. एकूण २,२०,७८६ रुपयांचा निधी जमा करून तो गुरुद्वारा सिंह सभा, घुग्घुस येथे जमा करण्यात आला आहे.
हा उपक्रम केवळ मानवतेचा परिचय देणारा नाही, तर आपत्तीच्या काळात सर्व धर्म, जाती आणि समाज एकत्र येऊन मदतीसाठी कसे उभे राहू शकतात याचे उत्तम उदाहरण आहे.
या सहकार्यामध्ये आझम खान, मोमीन शेख, अनीस सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, बाबू सिद्दीकी, अज़हर शेख, सानू सिद्दीकी, मुस्लिम खान, इस्लाम अहमद, इकरार भाई, जुबेर शेख आणि फैझान खान यांच्यासह संपूर्ण मुस्लिम समाजाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मुस्लिम बांधवांचा हा उपक्रम सर्वधर्म ऐक्य व बंधुत्वाचे एक आगळेवेगळे उदाहरण ठरला असून, स्थानिक पातळीवर त्याचे कौतुक केले जात आहे.
कठीण काळात दिलेली ही मदत, पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांसाठी आशेची एक नवीन किरण ठरणार आहे.