राजकुमार कछोट यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरांतील प्रतिष्ठित व्यापारी व बुलडाणा अर्बन बँकेचे स्थानीक सल्लागार राजकुमार कछोट यांचे दिनांक 11 सप्टेंबर 25 रोजी अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
मृत्यू पश्चात त्यांचे लहान बंधू वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता पवन कछोट यांनी त्यांचें मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. व जायंटस परिवाराचे डॉ. अशोक काबरा व संजय डोनगावकर यांचे सोबत संपर्क केला. व जालना येथील गणपती नेत्रालय च्या चमूस बोलावून त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले.
त्यांच्या पार्थिवावर देऊळगाव राजा येथिल वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुली, 1 भाऊ ,1 बहीन,जावई, काका, आत्या, मामा,असा बराच मोठा आप्त परिवार आहे.