अवैध रीतीने शासकीय गौण खनिज रेती 2 ब्रास वाहतूक करणारे बिना नंबरचे ट्रकटर ट्रॉलीसह जप्त
2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल वाहतूक नियंत्रण शाखेची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 12/09/25 रोजी दुपारी 2 वा वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकास उडान पुलावर एक बिना नंबर चे ट्रॉली असलेले ट्रॅक्टर मधये रेती वाहतूक करताना दिसून आले सदर ट्रकटर चालक भूषण शंकरराव कोल्हे रा बरबडी व त्यासोबत असलेला क्लीन्नर वामन हनुमंतराव मंजुळकर रा पिंपरी यांना सदर रेती वाहतूक करण्याचा पास परवाना रॉयल्टी TP आहेत काय याबाबत विचारणा केली असता त्यांनी रॉयल्टी TP नसल्याचे जाहीर केले त्यावरून वरील 2 ही आरोपीता जवळून स्वराज्य कम्पनी चे ट्रॅक्टर mh 32 P 4378 किमत 6 लाख रुपये बिना नंबरची ट्रॉली किमत 1.50.000 रुपये 2 ब्रास रेती किमत 12000 रुपये, टोपली फावडे असा एकूण 7.62.700 रुपयांचा मुद्देमाल वाहतूक पोलिसांनी पंचा समक्ष जप्त केला व वरील 2 ही आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 /2
खान व गौण खनिज नियमन अधिनियम कलम 21(1) अन्वये पो स्टे वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करून आरोपीताना अटक करण्यात आलेले आहे. पुढील तपास वर्धा शहर पोलीस करीत आहेत.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील. सहा फोजदार येळणे. पोहवा किशोर पाटील. पो हवा आशिष देशमुख, चालक स्वप्नील तंबाखे ने वाहतूक नियंत्रण शाखा यांनी केली आहे,