यशवंत ज्युनिअर कॉलेज सेवाग्राम येथे संविधान 75 वी कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
यशवंत ज्युनिअर कॉलेज सेवाग्राम व अनुलोम संस्थेच्या विद्यमाने आज यशवंत ज्युनिअर कॉलेज सेवाग्राम येथे संविधान 75 वी* हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून माननीय सागर कपूर सर अनुलोम भाग जनसेवक देवळी हे उपस्थित होते सोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका मा. वंदना राऊत मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनुलोम मित्र प्रशांत डोंगरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या पीपीटी ची माहिती मुख्य वक्ता माननीय सागर कपूर अनुलोम भाग जनसेवक देवळी यांनी दिली. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व कळावे आणि संविधानाचा सन्मान कसा राखण्यात यावा आपल्या राष्ट्रीय चिन्हांचे आपण कसे मान करायला हवे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली शेवटी कार्यक्रमाची प्रशंसा व अनुलोम संस्थेचे आभार नम्रता नाखले मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुलोम मित्र प्रशांत डोंगरे व समीर साहू यांनी मदत केली. अशाप्रकारे आजचा संविधान 75 वी या विषयाचा कार्यक्रम संपन्न झाला.