महसूल फेरफार प्रकरणांच्या लोक अदालतीचे आयोजन
भूमि अभिलेख कोरपना कार्यालयाकडून आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उप अधीक्षक भूमि अभिलेख चंद्रपूर/भद्रावती/वरोरा/चिमूर / ब्रम्हपूरी /नागभीड/सिंदेवाही मुल/सावली/पोंभूर्णा /गोंडपिंपरी /बल्लारपूर/राजूरा/ कोरपना /जिवती यांना महसुली फेरफार प्रकरणांची लोक अदालत आयोजित करणेबाबतचे पत्र दिले आहे.
मा. उपसंचालक भूमि अभिलेख, नागपुर प्रदेश,नागपूर यांच्या दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजीच्या सभेतील सुचनेनुसार मा. महसुल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रलंबित फेरफार प्रकरणांसंबंधाने लोक अदालत आयोजित करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
मा.महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्हयात विविध विभागांची आढावा सभा घेणार आहेत.त्यामुळे महसूल फेरफार प्रकरणांच्या विषया संबंधाने आढावा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या संबंधाने जिल्ह्यातील सर्व उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ पूर्वी आपले स्तरावरील प्रलंबित सर्व फेरफार प्रकरणा संबंधाने फेरफार अदालत घ्यावी असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्राद्वारे सूचित केले आहे.
त्याअनुषंगाने उप अधीक्षक भूमी अभिलेख कोरपना श्री प्रभाकर बढिये यांनी दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी फेरफार प्रकरणांच्या लोक अदालतीचे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कोरपना येथे ११.०० वाजता आयोजन केले आहे.फेरफार प्रकरण लोक अदालती मध्ये निकाली काढली जाणार असल्यामुळे जनतेनी ज्यास्त ज्यास्त फायदा घ्यावा असे आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख कोरपना श्री प्रभाकर ना. बढिये यांनी केले आहे