ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्वेलरीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्यचांदीचे दागीने लांबविले

तालुक्यातील घोडपेठ येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      अज्ञात चोरट्यांनी ज्वेलरीचे दुकान फोडून दुकानातील चांदी तथा सोन्याची दागीने असा ३ लाख ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक १२ ला सकाळी घोडपेठ येथे उघडकीस आली. याच चोरट्यांनी गावातील एक मेडीकल दुकान फोडले मात्र या दुकानातून काहिही चोरीला गेले नसल्याची माहिती आहे.

चंद्रपुर येथील शिवम वर्मा यांचे घोडपेठ येथे शाम ज्वेलर्स नावाचे ज्वेलरीचे दुकान आहे.सदर दुकान त्यांची आई चालविते.घटनेच्या आदल्या दिवशी त्यांची आई नेहमीप्रमाने रात्रोला दुकान बंद करुन चंद्रपूरला गेली.दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान फोडुन असल्याची माहिती घोडपेठ येथील त्यांच्या शेजारच्याने त्यांना दिली.माहिती मिळाल्यानंतर वर्मा यांनी घोडपेठ येथे येऊन दुकानाची पाहणी केली आसता दुकानात ठेवलेले दोन लाख सत्तर हजाराचे चांदीचे तर नव्वद हजाराचे सोन्याचे दागीने असा एकुन तिन लाख सत्तर हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.

सदर घटना सिसीटिव्ही कैमेऱ्यात कैद झाली आहे.सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनला देण्यात आली असुन भद्रावती पोलीस सिसीटिव्ही फुटेज व श्वानपथकाच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये