ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसुली अर्धन्यायिक प्रकरणांसाठी १७ सप्टेंबर रोजी लोक अदालत

चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी घेणार सुनावणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ अपर जिल्हाधिकारी स्तरावर सुरू असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा त्वरीत व कार्यक्षम निपटारा करण्यासाठी लोक अदालत आयोजित करण्याबाबत राज्य शासनाच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने 17 सप्टेंबर रोजी चंद्रपूर तहसील कार्यालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे या अर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी घेणार आहेत.

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी खोली क्रमांक 7, तळमजला, तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. अशाच लोक अदालत उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या स्तरावरसुध्दा होणार आहेत.

संबंधित प्रकरणांमध्ये वकीलपत्र दाखल केलेले सर्व अधिवक्ता व पक्षकार उपस्थित राहावे. तसेच जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यास जिल्हा बार असोसिएशनने सहकार्य करावे, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये