ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन तर्फे ढोरवासा येथे भव्य आरोग्य शिबिराचा प्रारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच न्यू इरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर मालिकेचा यशस्वी शुभारंभ 11 सप्टेंबर रोजी ढोरवासा ग्रामपंचायत येथे झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍड. श्री. रवींद्रजी भागवत होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थान न्यू इरा क्लीनटेकचे एमडी श्री. बाळासाहेब दराडे यांनी भूषविले. विशेष अतिथी म्हणून MIDC चे अध्यक्ष श्री. मधुसूदन रौगठा उपस्थित होते. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, ढोरवासा ग्रामपंचायतचे सरपंच-उपसरपंच, न्यू इरा क्लीनटेकचे अधिकारी श्री. सचिन धात्रक व सौरभ डाफ, ममता व मधुसूदन फाउंडेशनची टीम तसेच महात्मे नेत्रपीडी नागपूरचे पदाधिकारी उपस्थित होते. गावकऱ्यांनी लेझीम, ढोल-ताशा पथक व भजनांनी पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते श्री. बाळासाहेब दराडे यांचा सत्कार करण्यात आला.

शिबिराच्या पहिल्या दिवशी एकूण ३४० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण तपासणी (सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, रक्तशर्करा) ३४० रुग्णांची झाली. अस्थिरोग तपासणी (सांधे व हाडांचे आजार) २२५ रुग्णांची झाली असून एका रुग्णाला गुडघे प्रत्यारोपणाची गरज निदान झाली. स्तन कर्करोग तपासणी १३ महिलांची, तर मॅन्युअल तपासणी ९८ महिलांची करण्यात आली. नेत्र तपासणी ५३ रुग्णांची झाली असून त्यापैकी २० जणांना मोतीबिंदूचा संशय आढळून आला.

या शिबिरात नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, निदान व आवश्यक तेथे शस्त्रक्रियेपर्यंतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या शहरात न जाता त्यांच्या गावीच मोफत तपासण्या मिळाव्यात हा शिबिराचे मुख्य उद्देश आहे.

याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व या भव्य आरोग्य उपक्रमाचा लाभ घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये