ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोवर-रुबेला लसीकरण मोहीम : १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत २ मदरसा मधील ९४ बालकांचे होणार लसीकरण

चांदा ब्लास्ट

गोवर-रुबेला निर्मूलनाचे उद्दिष्ट 2026 पर्यंत साध्य करण्यासाठी राज्य शासनाने विशेष गती दिली आहे. अलीकडेच राज्यातील काही जिल्ह्यांतील आश्रमशाळांमध्ये गोवरचा उद्रेक आढळून आल्यामुळे, 15 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यातील सर्व आश्रम शाळा व निवासी मदरसांमध्ये विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

   या अनुषंगाने मनपा क्षेत्रातील संभाव्य गोवर – रुबेला आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी चंद्रपूर महानगरपालिका टास्क फोर्स समितीची बैठक 11 सप्टेंबर रोजी मनपा उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात पार पडली. या मोहीमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले असून याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत कृती आराखडा सादर करण्यात आला.

  मोहिमेत 5 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर-रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात येणार असून, त्यांचे संपूर्ण संरक्षण सुनिश्चित केले जाणार आहे. चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात भिवापूर वॉर्डातील दारुल उल मोहमदीया येथील मदरसा मध्ये 17 सप्टेंबरला तर रहमत नगर येथील गौसिया मदरसा मध्ये 18 सप्टेंबर रोजी एकुण 94 बालकांचे लसीकरण या मोहिमेत करण्यात येणार आहे.

   मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक लसीकरण सत्रासाठी स्वतंत्र लसीकरण पथक (Team) तयार करण्यात आले असून, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले असुन लसीकरणानंतर कुठल्याही प्रकारची गुंतागुंत होऊ नये यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहिमेची प्रचार प्रसिद्धी केली जात असुन या दोन्ही मदरसा मधील सर्व बालकांचे लसीकरण त्यांच्या पालकांनी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

   सदर बैठकीस वैद्यकीय नियंत्रण अधिकारी डॉ. साजिद मोहम्मद ,बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत,डॉ.आरवा लाहिरी,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयु गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. जयश्री मालुसरे, डॉ अल्फीया खान, डॉ. समृद्धी वासनिक,डॉ नरेंद्र जनबंधु,डॉ. अतुल चटकी,शारदा भुक्या, ग्रेस नगरकर,अब्दुल हमीद,गुलाम नबी रिजवी,अशफाक हुसैन उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये