स्वस्त दरात कापडाची खरेदी करून देतो म्हणून अजय मशांनी सोबत १ लाख ८० हजाराची केली फसवणूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी फिर्यादी नामे अजय मशांनी वय 46 वर्षे राहणार संत कवरराम शाळा, रामनगर तहसील.जिल्हा वर्धा याने पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे येऊन लेखी रिपोर्ट दिली की गैरअर्जदार नामे जयकिशन निर्मलकुमार मंगलानी वय 31 वर्षं राहणार अमरावती जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम दयालनगर तह.जिल्हा. वर्धा याने वर्धा येवून सांगितले की माझे अमरावती मध्ये रेडिमेड कपड्यांची दुकाण आहे तर तुला कपड्यांची दुकाण सुरू करायचीच असेल तर तुला मुद्दल भावाने खरेदी विक्री करण्याकरिता ठोक विक्री भावाने तुला खरेदी करता येईल तु मला ऑनलाईन रुपये माझ्या अकाऊंटवर पाठवून द्यावे तर एक किंवा दोन दिवसांमध्ये तुमच्या दुकानात रेडिमेड कपडे पोहचून जाईल मी गैरअर्जदार नामे जयकिशन निर्मलकुमार मंगलानी यांच्या अकाऊंटवर 1,80,140 रुपये पाठवून दिले यानंतर माझ्या मोबाईल दुकानात रेडिमेड कपडे पोहचले नाही आणि यानंतर गैरअर्जदार यांच्या मोबाईल फोन नंबर बंद दिसल्याने आम्ही गैरअर्जदार यांच्या शोध घेतला असताना तो कुठेही मिळून आलेला नाही याकरिता मी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे येऊन लेखी रिपोर्ट दिली आणि आज दिनांक रोजी 10 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी नामे जयकिशन निर्मलकुमार मंगलानी यांच्यावर कलम 318(4)BNS दाखल करण्यात आला आणि यांच्या तपास पोलीस उपनिरीक्षक गिताजंली गारगोटे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश गायकवाड व पोलिस शिपाई रामेश्वर आडे यांनी शोध घेतला असताना आरोपी नामे जयकिशन निर्मलकुमार मंगलानी हा दुस-या गुन्ह्यात वर्धा जिल्हा कारागृहात रवानगी झालेली आहे तर दिनांक रोजी वर्धा जिल्हा कारागृहात आज आरोपीला पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे ताब्यात घेण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर वर्धा पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलिस निरीक्षक संतोष ताले पोलिस उपनिरीक्षक गिताजंली गारगोटे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश गायकवाड व पोलिस शिपाई रामेश्वर आडे यांनी केलीय आहे.