ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

एकाने विषारी औषध प्राशन करून तर दुसऱ्याने गळपास घेऊन संपविले जीवन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत मंगरमेंढा येथील केवळराम शेरकी यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून तर बोरमाळा येथील केशव चौधरी यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

        पाथरी पोलीस स्टेशन बुधवारला मंगरमेंढा शेतशिवारात मृतक शेतकरी केवळराम शेरकी (वय ५० वर्ष) यांचे मृतदेहाजवळ शेतात फवारणी करण्याचे कीटकनाशक आढळले असल्याने मर्ग दाखल केले आहे. तर दुसऱ्याच दिवशी गुरुवारला बोरमाळा येथील शेतकरी केशव चौधरी यांनी शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले आहे. सदर शेतकऱ्याकडे ३ एकर शेती असून जवळपास ५० हजार कर्ज आहे. त्यामुळे कर्जबाजारीतून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.

     सलग दोन दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने सावली तालुक्यात खळबळ माजली असून सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी जोर धरत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये