सतीश राठोड आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- नोकेवाडा येथील बहिणाबाई विद्यालयातील सहाय्यक शिक्षक सतीश राठोड यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सतीश राठोड यांनी आपल्या जवळपास १५ वर्षे सेवेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच शाळेत राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम,शाळेची पटसंख्या वाढीसाठी केलेले प्रयत्न, स्पर्धात्मक परीक्षे विषयी मार्गदर्शन, शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी खेळाच्या माध्यमातून शिक्षण, विविध शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती इत्यादी शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आमदार सुधाकर अडबाले व भीमा अडबाले यांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह आणि. भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे.या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.