ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

येल्लापुरात “एक दिवस गावासाठी” या उपक्रमाची यशस्वी सुरुवात

दिपक साबने, प्रशांत कांबळे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- गावातील प्रत्येक व्यक्तीने गावासाठी एक दिवस किंवा दिवसातून काही तासाचा वेळ दिला तर गावातील अनेक समस्यांचे निराकरण होऊन गाव विकासासाठी हातभार लागेल या संकल्पनेतून येल्लापूर येथील युवकांनी एकत्र येत “एक दिवस गावासाठी” या उपक्रमाचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आतील व बाहेरील परिसरातील गवत काढण्यात आले. तसेच पंचशील बौद्ध विहार, सभा मंडप व जुनी तलाठी इमारत यांच्या सभोवताल वाढलेल्या गवतावर औषधाची फवारणी करण्यात आली. व पुढील पंधरा दिवसात पंचशील बौद्ध विहाराची स्वच्छता व वृक्षारोपण करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

      या उपक्रमात प्रामुख्याने दिपक साबने, प्रशांत कांबळे, गणपत सोनकांबळे, किर्लोस गायकवाड, कर्मराज कांबळे, कल्याण सरोदे, श्रीनिवास गायकवाड, आतिश गायकवाड, बालाजी सावंत, स्वप्निल सोनकांबळे, विनोद क्षीरसागर, रजनीकांत वाघवसे यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. तर शुद्धोधन निखाडे, आत्तम वाघमारे, शुद्धोधन चंदनखेडे, सतीश क्षीरसागर यासह अनेकांनी काही महत्वाच्या कामामुळे सहभागी होता आले नसल्याचे बोलून दाखवत उपक्रमाचे कौतुक केले. तसेच धोंडीराम बनसोडे, शिवदास शिनगारे, भास्कर सोनकांबळे यांचेसह अनेकांनी मार्गदर्शन करत उपक्रमाचे कौतुक केले.

गावातील काही सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे गावात “एक दिवस गावासाठी” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून हा उपक्रम निरंतर सुरू ठेवण्यात येणार आहे. फक्त शासनाच्या योजना राबवून गावाचा विकास होत नाही तर गावाच्या विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असतो. ग्रामस्थानी ठरवले तर कोणतेही काम चुटकीसरशी होते. परंतु यासाठी लोकसहभागाची मानसिकता प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. लोकसहभाग वाढवून गावाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी आणि माझे सहकारी निरंतर प्रयत्न करू.

           – दिपक साबने, सामाजिक कार्यकर्ता

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये