ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“देऊळगाव राजा येथे श्री गणेश मंडळांना पूजा थाळीचे वितरण”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा ही एक ऐतिहासिक व सांस्कृतिक नगरी आहे. या नगरीत श्री बालाजी महाराजांच्या पुण्यपावन वास्तव्यामुळे येथे विविध उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अलीकडेच येथे श्री गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले असून, माता गौरीचेही आगमन आनंद आणि उल्हासात पार पडले आणि पूजनही संपन्न झाले.

देऊळगाव राजामध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांना पूजा थाळीचे वितरण श्री गणेश प्रोत्साहन समितीचे माजी अध्यक्ष राजेश भुतडा यांच्या वतीने करण्यात आले. या पूजा थाळ्यांचा उपयोग गणेश मंडळातील पूजेसाठी केला जाणार आहे, ज्यामध्ये हळद-कुंकू व इतर पूजेच्या साहित्यासाठी योग्य रचना केलेली आहे.

अनेक गणेश मंडळांनी या पूजाथाळीच्या वितरणावर आनंद व्यक्त केला आहे. आजअखेर सुमारे ३० पूजाथाळ्यांचे वितरण गणेश मंडळांना करण्यात आले असून, मंडळाचे अध्यक्ष यांचा शाल देऊन सत्कारही करण्यात येतो. उर्वरित गणेश मंडळांनाही लवकरच या पूजा थाळ्या वितरित केल्या जाणार आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देऊळगाव राजा येथील सिव्हिल कॉलनीमध्ये स्थित श्री अष्टविनायक गणेश मंडळाला पूजा थाळी समर्पित करताना, तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रसाद महाजन यांचा सत्कार करताना, लोकमत समाचारचे प्रतिनिधी आणि श्री गणेश मंदिर ट्रस्टचे सदस्य प्रा. विनायक कुलकर्णी, श्री गणेश प्रोत्साहन समितीचे अध्यक्ष राजेश भुतडा, गजानन निकम, माजी नगरसेवक धर्मराज हनुमंते, माजी नगरसेवक निशिकांत भावसार आणि इतर मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये