घोडपेठ येथील महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरातून जाणाऱ्या नागपूर–चंद्रपूर या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दोनचाकी तसेच चारचाकी वाहनांचे अपघात घडले असून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने नागपूर, भद्रावती व चंद्रपूरकडे प्रवास करतात. मात्र खड्ड्यांमुळे वेगाने जाणारी वाहने अचानक थांबवावी लागत असल्याने वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होत आहे. काही वाहनांचे टायर फुटणे, सस्पेन्शन तुटणे यांसारख्या तांत्रिक बिघाडाच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत आहे. सदर महामार्ग हा प्रवाशांसाठी महत्वाचा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजविणे गरजेचे आहे.
नागपूर – चंद्रपूर महामार्गावरून दररोज शेकडो गाड्या धावतात. अशावेळी रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची उदाहरणे आहेत. सार्वजनीक बांधकाम विभागाने ताबडतोब रस्त्यांची दुरूस्त करावी.
– विवेक लोणे, -अध्यक्ष, तंटामुक्त समिती घोडपेठ