गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर परतावा देण्याचे आमीष दाखवुन फसवणूक
आरोपीतांना अटक करुन 44 लाख 13 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी व इतर यांना आरोपीने त्यांचे PVR मल्टीट्रेडींग लॅब, आर्वी नाका, वर्धा या फर्म च्या माध्यमातुन ट्रेडींग केल्यास गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर परतावा देण्याचे आमीष दाखवुन फिर्यादी व इतर लोकांकडुन रक्कम स्विकारुन त्याबाबचे हमीपत्र लिहुन देवुन विश्वास संपादन केला तसेच गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर सुरुवातीला मोबदला देवुन नंतर परतावा देण्याकरीता टाळाटाळ करुन फिर्यादी व इतर साक्षदारांची एकूण 62,02,000/- रु. ची फसवणुक केली. फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान गुंतवणुकदारांची फसवणुकीची रक्कम ही 1,07,50,000/- रु एवढी निष्पन्न झाली आहे
सदर गुन्हयाची क्लिष्टता बघता गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा हे करीत आहे.
सदर गुन्ह्याचे तपासातील PVR मल्टीट्रेडींग लॅब, या फर्मचा संचालक मुख्य आरोपी विक्रम ज्ञानेश्वर पर्वत वय 30 वर्ष, रा. गणेशनगर, बोरगांव मेघे वर्धा हा गुन्हा दाखल झाले पासुन पोलीस कडुन आपली अटक चुकवुन फरार होता.
गुन्हयात आरोपीचा कसोशीने तपास केला. परंतु यातील मुख्य आरोपीबाबत काहिही माहिती मिळुन येत नव्हती. आरोपी हा परराज्यात राहुन आपले रहाण्याचे ठिकाण नेहमी बदलत होता. तेव्हा त्याचा तांत्रीक पध्दीतीने कोलकाता-मुंबई-नागपुर असा रुट पॅटर्नचा अभ्यास करुन शोध घेवुन गुन्ह्यातील आरोपी विक्रम ज्ञानेश्वर पर्वत यास बेसा नागपुर येथुन ताब्यात घेवून गुन्हयात दि. 19.08.2025 रोजी अटक करुन त्याचा दि. 02.09.2025 पावेतो PCR घेण्यात आला. तसेच मुख्य आरोपीला सहकार्य करणारा गुन्हयातील आरोपी क्र. 2) किरण हिरासिंग पवार, वय 29 वर्ष, रा. किन्नी किनाळा, ता. घाटंजी जि. यवतमाळ यास दि. 01.09.2025 रोजी अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपी याचेकडुन 09 मोबाईल, लॅपटॉप, 22 ATM कार्ड, रोख व सोण्याचे अंगठ्या तसेच आरोपीने स्वतः पैशे देवुन दुस-याचे नावाने खरेदी केलेल्या ISUZU V क्रॉस व MERCEDES मर्सेडीज कंपनीची दोन कार असे एकुण 44,13,170/- रु. चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. तसेच गुन्हयात बँकेतील रोख रक्कम 8,71,116 रु. व आरोपी यांनी मुथुट फायनान्स वर्धा मध्ये गहाण ठेवलेले सोने (गोल्ड) 558.2 ग्रॅम व मुथुट फायनान्स कोलकाता येथे गहाण ठेवलेले अंदाजे 200 ग्रॅम सोने (गोल्ड) सुध्दा गोठविण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे व पोलीस उप अधीक्षक श्री. पुंडलीक भटकर यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री. निशांत फुलेकर, व स्टाफ पोहवा निकेश गुजर, कुनाल डांगे, स्वनिल भारव्दाज, दिनेश बोधकर पो-कों प्रतिक नगराळे, चालक, मनोज झाडे, संतोष जयस्वाल, राजेश पचारे यांनी केली.