दुकानाचे शटर तोडून तांब्याची तार चोरी करणारी टोळी जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी यांचे वसंत टॉकीज समोरील DS मोटर रिवाइंडिंग दुकानांमध्ये दी 21/08/25 ते दी 22/08/25 चे रात्र दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे सेटर तोडून दुकानातील तांब्याचे 15 बंडल किंमत 1,50,000/- रुपये चा माल चोरून नेल्याने फिर्यादी नामे अशरप अली मजर अली रा.हनुमान वॉर्ड वर्धा यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक 22/08/25 रोजी अपराध क्रमांक 1205/2025 कलम 305(अ) 331(3), 331(4) बि.एन.एस. 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना दिनांक 03/09/2025 रोजी मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून यातील आरोपी 1) सुनील उर्फ रॉकी शांताराम शिंदे वय 24 रा बोरगाव टेकडी वर्धा 2) सुजल युवराज कुंबरे वय 19 रा बोरगाव टेकडी वर्धा 3) अनिकेत उर्फ डीगो संजय बडवाईक वय 20 रा तळेगाव टालाटुले ता. जि. वर्धा 4) वी. स. बालक नामे वय 17 वर्ष रा. तळेगाव टालाटुले ता. जि. वर्धा यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा आरोपी क्र. 5) ऑटो चालक राजा कैतवास रा. बोरगाव टेकडी वर्धा याचे मदतीने केल्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल आरोपी 6) आदिल अनिस शेख वय 28 वर्ष रा. इम्तियाज अन्सारी यांचे घरी किरायाने प्लॉट नंबर 44 मैत्री कॉलनी नागपूर , 7) आरिफ मोहनोदिन शेख वय 34 वर्ष राहणार काचोरी लेआउट नागपूर रोड वर्धा. यांचे मदतीने नागपूर येथील भंगार दुकानदार नामे शिवकुमार शाहू रा. प्लॉट क्रमांक 76 शनी मंदिर जवळ कळमना, नागपूर यास विकल्याचे सांगत आहे. सदर गुन्हात वापरलेला ऑटो रिक्षाआरोपी क्रमांक 01 याचे कडून किं 1,00,000/-रू जप्त करण्यात आला आहे. दुकानाचे शटर तोडून तांब्याची तार चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन, वर्धा शहर करीत आहे.
सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, प्रकाश लसुते, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, विकास मुंढे, सुगम चोधरी, शूभम राउत, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, सुमेध शेंद्रे सायबर सेल चे अंमलदार दिनेश बोरकर अंकित जिभे यांनी केली.