सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अर्थिक समस्यांची आ. अडबाले यांनी घेतली दखल
शिक्षक दिनी होणारे सेवानिवृतांचे आंदोलन स्थगित

चांदा ब्लास्ट
दि. २ सप्टेंबर २०२५ ला आमदार सुधाकर अडबाले यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मध्ये मा. सा. कन्नमवार सभागृहात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना यांची समस्या निवारण सभा घेण्यात आली.
सदर सभेला मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख व अर्चना मासिरकर व १५ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सदर सभेमध्ये संघटनेने दिलेल्या २३ मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर मागण्यांमध्ये एकस्तर थकबाकी १४८३ शिक्षकांच्या खात्यावर सोमवारपर्यंत जमा करण्यात येईल. उर्वरित साठी जिल्हा परिषदकडे निधी शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सन २०१६ पासून प्रलंबित असलेले गट विमा सर्व प्रकरणे शिबिर घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत काढण्यात येतील. सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे थकीत असलेल्या हप्त्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी आठ दिवसात मागणी करावी त्यानुसार वरिष्ठाकडे मागणी करून निधी उपलब्ध झाल्यानंतर हप्ते देण्यात येतील. सेवानिवृतांचे समस्यांसाठी दर महिन्याला पेन्शन अदालतची मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यानुसार दर दोन महिन्याला सभा घेण्यात येईल. पुढील सभा ४ नोव्हेंबर घेण्याचे निश्चित झाले. उपदानातून वसूल करण्यात आलेली एकस्तरची रक्कम संबंधितांना त्वरित देण्याचे मान्य करण्यात आले. संगणक वसुलीचे mscit संघटनेने सादर केलेले २४ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले. त्याकरिता आमदार अडबाले स्वतः प्रयत्न करणार आहेत.
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी बाबुराव मडावी व तुकाराम कुचणकर इतर सर्वांचे रजा रोखीकरण की रक्कम निधी उपलब्ध झाल्याबरोबर त्यांचे खात्यात जमा करण्यात येईल. सेवानिवृत झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल तात्काळ मंजूर करण्यात येईल. माध्यमिकमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी तात्काळ मंजूर करण्यात यावी तसेच प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी मंजूर करावी. ३० ऑक्टोबर पर्यंत सदर दोन्ही प्रकारचे फाईल निकाली काढण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या नोटीसमुळे पुढील दोन वर्ष पर्यंत निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यांचे मूळ सेवापुस्तक एक वर्षांपूर्वी अद्यावत करण्यात येणार आणि पेन्शन केस निवृत्तीच्या सहा महिने पूर्वी जिल्हा परिषद ला पाठवण्यात येईल, असे सांगण्यात आले. जीपीएफ ठेव संलग्न विमा संबंधाने मयत झालेल्या शिक्षकांचे ६० हजार रुपये प्रमाणे ९१ कर्मचाऱ्यांचे खात्यात सदर निधी जमा करण्यात आला असून उर्वरित ३५ प्रकरण त्वरित मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा पुरस्काराची एक वेतनवाढ आठ शिक्षकांना त्वरित देण्यात यावी व ज्यांची रक्कम उपदानातून वसूल करण्यात आली. त्यांची परत करण्यात यावी, त्यास मान्यता देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढण्यात येतील.
वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ खुल्लर समितीने दिलेल्या निर्देशानुसार सर्व पात्र शिक्षकांना एक महिन्यात लाभ देण्यात येतील तसेच दोन वर्षापासून प्रलंबित असलेले पेन्शन निवृत्ती प्रकरण नरेंद्र इटनकर, ज्ञानेश्वर सिडाम यांचे मंजूर झाले असून प्रमोद धानकुटे यांचे पुढील पंधरा दिवसात प्रकरण निकाली काढण्यात येईल.
याशिवाय उर्वरित समस्यांमध्ये अनेक वर्षापासून मरनोत्तर मिळणारे सानुग्रह अनुदान पंधरा हजार रुपये प्रमाणे अनेक तालुक्यात देण्यात येत नाही ते संबंधितांची कुटुंबीयांना देण्यात येईल.
३१ मार्चपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संघटनेला देण्यात आले निवड श्रेणी बाबत प्रशासन व संघटना यांची विशेष सभा घेण्याचे आजच्या सभेत ठरविण्यात आले, पेन्शन ५ तारखेपूर्वी करावी. सभेच्या शेवटी संघटनेच्या वतीने मुख्य मार्गदर्शक विजय भोगेकर यांनी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, उपस्थित सर्व अधिकारी यांचे आभार मानून शिल्लक असलेल्या सगळ्या समस्या दोन महिन्याचे आत निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे संघटनेकडून होणारे ५ सप्टेंबर शिक्षक दिनीपासूनचे धरणे आंदोलन ४ नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे सभेत जाहीर केले.