देऊळगाव राजा तालुक्यातील वुशु वीर चमकले
पाच खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बुलडाणा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या शालात जिल्हास्तरीय वुशु क्रीडास्पर्धेत स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी, देऊळगाव राजा येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्यात ठसा उमटवला आहे. त्यांच्या या चमकदार कामगिरीमुळे पाच खेळाडूंची शालेय विभागीय वुशु क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये
मैथिली तायडे, मयुरी थेटे, राघव झोरे,अरुण शिवरकर, हरिओम रामाने,या विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशामुळे देऊळगाव राजा शहराचे नाव जिल्ह्यात झळकले असून पालक, शिक्षक व स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी सशक्त खेळ दाखवून आपल्या मेहनतीचे सोने केले. विभागीय पातळीवरही हे खेळाडू यश संपादन करतील, असा विश्वास प्रशिक्षक राजेश खांडेभराड आणि पालकांनी व्यक्त केला आहे.