जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयगाव येथे वाचन स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव येथे 2 सप्टेंबर रोजी वाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. १ली ते ४थी आणि ५वी ते ७वी तील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले समजपूर्वक वाचन कौशल्य दाखवले. प्रत्येक विद्यार्थ्याने कथा व विविध साहित्यिक उतारे आत्मविश्वासाने वाचून दाखवले. आणि त्या उताऱ्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मोठ्या उत्साहात दिली.
परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उच्चारशुद्धता, गती, समजपूर्वक वाचन आणि सादरीकरण या बाबींवर गुणांकन केले. विद्यार्थ्यांचे वाचन ऐकून उपस्थित शिक्षक व पालक यांना अपार आनंद झाला.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला.
शेवटी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून सर्वांना रोज समजपूर्वक वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
सदर वाचन स्पर्धा अंबुजा सिमेंट लिमिटेड च्या सी एस आर अंतर्गत राबविण्यात आली. अंबुजा फाऊंडेशनच्या शिक्षण विभागाच्या समन्वयक सरोज अंबागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
वाचन स्पर्धेला उपस्थित मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या राणी धवणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
वाचन स्पर्धेचे आयोजन कम्युनिटी मोबेलायझर हर्षाली खारकर व पुस्तकपरी वर्षा जुनघरे यांनी केले.