बल्लारपूर नगरपरिषदेतर्फे एस.एन.डी.टी. विद्यापीठात वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट
एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई च्या बल्लारपूर येथील आवारात २ ऑगस्ट रोजी नगरपरिषद बल्लारपूर च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.सदर कार्यक्रम विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत घेण्यात आला.
वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे म्हणून नगर परिषद ,बल्लारपूर च्या वतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने महिला विद्यापीठ मुंबईचे चे बल्लारपुर केंद्र महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल,बल्लारपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी संचालक डॉ.राजेश इंगोले , सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड व समन्वयक डॉ.वेदानंद अलमस्त सह राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समन्वयक सह. प्रा. श्रुतिका राऊत उपस्थित होत्या