शितलामाता श्री गुरुदेव महिला भजन मंडळाचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संत भजनांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्य करणारे शितलामाता श्री गुरुदेव सेवा भजन मंडळाचा सत्कार नुकताच करण्यात आला.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने समाधी वार्डातील सेजल प्लाझा येथे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते मंडळाच्या अध्यक्षा सौ. नंदा मस्के व सर्व सदस्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य पत्रकार प्रभाकर आवारी, माजी सैनिक सुर्यभान तुमसरे, रजनी बोढेकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवयित्री रोहिणी मंगरूळकर यांनी केले. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी भजन आणि जीवन यावर भाष्य करून शितलामाता महिला भजन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले . भजन गायक म्हणून सौ. वामिना मेंढे, कल्पना बुरांडे, वीणा पेंदाम, वर्षा पिंपळे, शुभांगी रोडे, शोभा काकडे, रीना कावळे, माधुरी क्षिरसागर, कु. समीक्षा रोडे आदींनी उत्तम सेवा दिली. माजी सैनिक सुर्यभान तुमसरे यांचाही उत्कृष्ट तबला वादक म्हणून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदय मंगरूळकर तसेच झाडे परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.