ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर, येथे मानसिक आरोग्य विषयक कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर येथील आंतरराष्ट्रीय तक्रार समिती यांच्या वतीने, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, एम-पॉवर आणि सेवधना प्रकल्प यांच्या सहकार्याने सामान्य मानसिक आरोग्यावर कार्यशाळा दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते जिल्हा समन्वयक श्री. अगस्तीण गायकवाड होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते. कार्यक्रमाची सुरुवात आयसीसी समन्वयक प्रा. चेतन डी. वैद्य यांच्या प्रस्ताविकाने झाली.

आपल्या मार्गदर्शनात श्री. अगस्तीण गायकवाड यांनी मोबाईल व्यसन आणि त्यावर मात करण्याचे उपाय, मानसिक आरोग्याचे महत्त्व, तसेच उदासी (डिप्रेशन) याची कारणे व त्यावर उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्वतःला प्रोत्साहित कसे करावे यावरही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलेंद्र देव यांनी मानसिक आरोग्याबाबत जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यशाळेत प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग आणि आयसीसी समितीचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये