ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ.ई.एस. गर्ल्स जुनिअर कॉलेज तर्फे प्रा. स्नेहल बांगडे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न!

चांदा ब्लास्ट

  दिनांक 30 ऑगस्ट 2025 ला प्रा. स्नेहल अनिल बांगडे मॅडम यांचा सेवानिवृत्तीपर निरोप व शुभेच्छा कार्यक्रम एफ. ई.एस. गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फीमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. ॲड. विजयरावजी मोगरे, सचिव ॲड. पुरुषोत्तमजी सातपुते, कार्यकारणी सदस्या श्रीमती शांतकाकू पोटदुखे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता महेशकर मॅडम, सत्कारमूर्ती प्रा. स्नेहल बांगडे मॅडम, त्यांचे यजमान अनिल बांगडे, ज्येष्ठ प्रा. मुगल सर, पर्यवेक्षक किरण पराते मंचावर स्थानापन्न होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व औपचारिक स्वागताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुगल सर यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालय तर्फे प्राचार्या सौ. गीता महेशकर मॅडम व प्रा. प्रवीण लोडे सर यांनी मॅडमच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उज्वल भविष्याच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कनिष्ठ महाविद्यालय, हायस्कूल व कर्मचारी पतसंस्थेतर्फे बांगडे मॅडम यांना भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थेतर्फे सचिव ॲड. श्री. पुरुषोत्तमजी सातपुते साहेब यांनी शुभेच्छा पर संबोधनात मॅडम ने दिलेल्या सेवाकार्यामुळे कॉलेजच्या नावलौकिकात मोलाचा हातभार लागला असे प्रतिपादन केले. सोबतच संस्थेच्या सदस्या श्रीमती शांताकाकू पोटदुखे यांनी शुभेच्छा पर आशीर्वाद दिला.

सत्कारमूर्ती स्नेहल अनिल बांगडे मॅडम यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आजचा मान सन्मान प्राप्त करू शकले , भविष्यातही या संस्थेचे व शाळेचे ऋण हृदयात सतत तेवत राहिल अशी सदिच्छा व्यक्त केली.

संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. श्री विजयरावजी मोगरे साहेब यांनी शुभेच्छापर संवेदना व्यक्त करतांना एफ.ई.एस. परिवारातील एक मौल्यवान सदस्याला निरोप देताना अतिव दुःख व्यक्त करून ज्यांनी आपल्या कार्य- कर्तृत्वाने शिक्षक, विद्यार्थिनी व शाळेच्या नावलौकिकात फार मोलाची भर घालून संस्थेच्या उत्कर्षात सिंहाचा वाटा उचलला असे गौरव उद्गार काढले.

 प्रा. श्रीमती कुरेशी मॅडम यांनी मान्यवरांच्या स्वागता प्रित्यर्थ स्वागतगीत तथा निरोप गीत गायन करून उपस्थितांना भावना विवश केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. धनश्री चिताडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये