आदर्श हिंदी विद्यालयात संविधान-७५ वर्षपुर्वी साजरी
शालेय विद्यार्थ्यांनी जानुन घेतले संविधानाचे सार्वभौमत्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- शालेय विद्यार्थ्यांना संविधानातील मुलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणिव व्हावी यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम या सामाजिक संस्थेव्दारा परिसरातील विद्यालय तथा महाविद्यालयात संविधान जागर उपक्रम घेण्यात येत आहे.
आदर्श हिंदी विद्यालय गडचांदुर येथे नुकताच संविधान-७५ जागर कार्यक्रम घेण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शिका सुषमा दालवनकर यांनी संविधानामुळे दैनंदिन जीवनात आपल्याला विविध अधिकार बहाल करण्यात आले.याबाबद मार्गदर्शन करून संविधानाचे सार्वभौमत्व विशद केले.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य आवाजातील ध्वनिफीत विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली.
पीपीटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानातील स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय ही तत्वे अवगत करून देण्यात आली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.मंजुषा पंकज मत्ते, मुख्याध्यापिका वैशाली हरकंडे, अनुलोम भाग जनसेवक राजुरा सतिश मुसळे, सहाय्यक शिक्षक राकेश गोरे,पुरूषोत्तम निब्रड,पुरूषोत्तम बोरकर, अरविंद मेश्राम, देवप्रकाश पोद्दार,अनंत काळे,अनिल भारती, निक्की सिंह यांचे सह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक राकेश गोरे यांनी केले.