राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलची मैथिली तायडे जिल्हास्तरीय विजेती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बुलडाणा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जित-कुन- क्रीडास्पर्धेत देऊळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत कामगिरी केली असून शालेय विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.ही स्पर्धा क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राजेश खांडेभराड सरांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय विजय मिळवला.
विजेते विद्यार्थी –
14 वर्षाखालील गट:
आर्यन पवार – प्रथम
श्रीपाद चव्हाण – प्रथम
कृत्तिका अतुरकर – द्वितीय
निलेश शिवरकर – द्वितीय
17 वर्ष वयोगट:
48 किलो गट – मैथिली तायडे (विजेती, विभागीय निवड)
19 वर्ष वयोगट:
53 किलो गट – मयुरी थेटे
17 वर्ष मुले:
45 किलो गट – राघव झोरे
48 किलो गट – हरिओम रामाने, अरुण शिवरकर
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मीनल शेळके ,सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी दिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले
विशेष ठळक बाब राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी मैथिली तायडे हिने जिल्हास्तरीय फायनल जिंकून विभागीय पातळीवर आपली निवड पक्की केली आहे. तिच्या कामगिरीमुळे शाळेचे व देऊळगाव राजाचे नाव जिल्हाभरात झळकले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे देऊळगाव राजा शहरात व परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, विभागीय पातळीवरील आगामी स्पर्धेत ते निश्चितच उत्तम यश मिळवतील असा विश्वास पालक, शिक्षक व क्रीडा प्रेमींनी व्यक्त केला आहे.