ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक _ गट शिक्षणाधिकारी दादा मुसदवाले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भटक्या विमुक्त जाती जमाती ची अनेक मुले मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत तेव्हा या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी सामाजिक संघटनानि मदत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे असे मत गट शिक्षणाधिकारी दादा मुसदवाले यांनी देऊळगाव राजा येथे अजय शिवरकर यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या भटके विमुक्त दिवस कार्यक्रमात व्यक्त केले.

महापुरुषांना अभिवादन करून भटके विमुक्त दिवस दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा शाम मुडे यांनी सुद्धा मागदर्शन केले. कार्यक्रमाला मारोती शिवरकर,अशोक कुलाल गोविंदराव बोरकर,अजय भाऊ शिवरकर,जानराव गायकवाड,दिनेश चव्हाण,रामचंद्र शिवरकर,परमेश्वर शिंदे, ॲड राजूभाऊ मान्टे, पंजाबराव यादवेकर, पंडित भाऊ सोळुंके,सुनील सोळुंके, रवी शेनूरे, रामचंद्र गायकवाड,रवी पिंपळे, सुरेंद्र जाधव, अजगरबाई शहा, आनंदा रामा शिवरकर, मल्हारी एकनाथ शिवरकर,अजसिंग बावरे, जानराव हटकर गणेश शिवरकर, आकाश साळवे,संदीप शिंदे,शंकर शिवरकर,संतोष सोळूंके,संतोष बोरकर, संजय शिवरकर,अरुण शिवरकर, विनोद शिवरकर,राहुल हटकर,अभिजित राजे, अभिजित शिवरकर, कृष्णा शिवरकर, उपस्थित होते.

 भटके समाजाला नवी दिशा मिळण्यासाठी सर्वांनी शिक्षणावर भर द्यावा असे मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये