राष्ट्रसंत साहित्यावरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत १३४३ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने गेल्या वर्षी प्रमाणेयावर्षीही चंद्रपूर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा निःशुल्क आहे होती.
इयत्ता ७ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचे पुढील विषय दिलेले होते . राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील ग्रामनाथ , राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील सणोत्सव या विषयांवर एकूण १३४३ शालेय विद्यार्थ्यांनी निबंधस्पर्धेत सहभाग दर्शविला.
सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे असून उत्तम निबंध लिहिणाऱ्यां स्पर्धकांतून विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात येतील.
सदर स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील एफ.ई.एस गर्ल्स हायस्कूल, छोटूभाई पटेल हायस्कूल, लोकमान्य टिळक विद्यालय, विकास विद्यालय विहीरगाव, जनता विद्यालय कोठारी, जनता विद्यालय घुग्घुस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी, रेड रोज कान्व्हेट बल्लारपूर, इंदिरा गांधी विद्यालय चकविरखल, विद्यामंदिर हायस्कूल उर्जानगर, राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूर, जि.प. शाळा चांदसुर्ला खैरगाव, नवजीवन हायस्कूल राका, शिवाजी हायस्कूल राजुरा, महात्मा फुले विद्यालय घाटकुळ, जनता विद्यालय ताडाळी , कर्मवीर विद्यालय, मुल , टेकाडी, येनबोडी आदी ठिकाणी निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
आयोजन समिती सदस्य राजेंद्र हजारे, प्रा. नामदेव मोरे, डा. धर्मा गावंडे (सावली), डॉ. श्रावण बानासुरे (बल्लारपूर), कार्तिक चरडे , रामकृष्ण चनकापुरे (पोंभूर्णा), मुख्याध्यापिका महेशकर, रोहिणी मंगरूळकर,प्रा. संगिता मालेकर (चंद्रपूर), मुख्याध्यापक गजानन खामनकर ,एड. राजेंद्र जेनेकर (राजुरा), लटारू मत्ते, मनोहर बोबडे,बळीराम बोबडे, मधुकर भगत, महेंद्र दोनोडे (राका), देवराव कोंडेकर (उर्जानगर),प्रा. वसुधा देवगडे (ब्रम्हपुरी), विश्वास सूर (परसोडी), लक्ष्मीकांत खाडे, नामदेव पिज्दूरकर (मुल), सुखदेव चौथाले आदींचे मुख्य आयोजन समितीचे डॉ. बाळ पदवाड, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, श्री गुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. अशोक यावले, सचिव विठ्ठलराव पुनसे आदींनी उत्तम स्पर्धा घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.