छायाचित्रकार दिनी जेष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान
जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तथा सावली तालुका फोटोग्राफी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छायाचित्रकर दिन साजरा करण्यात आला.
यात विविध स्तरावरील फोटोग्राफर संघटनेच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला व सावली तालुक्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार पराग स्टुडिओचे संचालक आकाशकांत महादेव सहारे यांचा सुभाष कासनगोट्टूवार, व गुड्डू टहलियानी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन जेष्ठ छायाचित्रकार म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन रायपुरे, संस्थेचे अध्यक्ष फुलचंद मेश्राम, सावली तालुका संघटनेचे अध्यक्ष विनोद बांगरे यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे सदस्य मुकुंदाजी गवारे,सचिव प्रवीण द्विवेदी, कोषाध्यक्ष राहुल भरडकर,विजय गोंगले, राजू नागोसे, व सावली तालुक्यातील सर्व छायाचित्रकार उपस्थित होते.
यावेळी आकाशकांत सहारे यांनी बोलताना हा माझा एकट्याचा सत्कार नसून सावली तालुक्यातील सर्व छायाचित्रकाराचा सत्कार आणि सन्मान आहे अशाप्रकारे शब्द प्रगटन केले. व सर्वांचे आभार मानले.